दिलजीत दोसांझच्या चाहत्यांना मोठा धक्का!

रिलीजच्या 48 तासांतच OTT वरून हटवला ‘सतलुज’

    दिनांक :06-Jul-2026
Total Views |
मुंबई
satlaj removed अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि विविध वादांनंतर प्रदर्शित झालेला अभिनेता दिलजीत दोसांझचा बहुप्रतिक्षित ‘सतलज’ हा चित्रपट रिलीजच्या अवघ्या ४८ तासांतच भारतातील OTT प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आला आहे. ३ जुलै २०२६ रोजी ZEE5 वर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतानाच हा निर्णय घेण्यात आल्याने चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 

satlaj removed from zee5 in india just 48 hours after release diljit dosanjh fans disappointed 
चित्रपट हटवल्यानंतर ZEE5 ने अधिकृत निवेदन जारी करत प्रेक्षकांचे आभार मानले. निवेदनात, ‘सतलज’ला प्रदर्शनानंतर मिळालेला प्रतिसाद आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. चित्रपटावर प्रेम करणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो, असे म्हटले आहे.
प्लॅटफॉर्मने पुढे स्पष्ट केले की, ‘सतलज’ आणि त्यामागील सर्जनशील दृष्टिकोनाच्या आम्ही ठामपणे पाठीशी आहोत. मात्र, सध्याच्या परिस्थितीमुळे पुढील सूचना मिळेपर्यंत हा चित्रपट भारतात स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध राहणार नाही. चित्रपट पुन्हा प्रेक्षकांसाठी उपलब्ध व्हावा यासाठी आवश्यक कायदेशीर आणि इतर प्रक्रिया सुरू असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.या चित्रपटाचा प्रवास satlaj removed  सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरला होता. ‘पंजाब 95’ या मूळ नावाने २०२२ मध्ये चित्रपट सेन्सॉर प्रमाणपत्रासाठी पाठवण्यात आला होता. त्यावेळी सेन्सॉर बोर्डाने तब्बल १२७ बदल सुचवले होते. त्यामुळे चित्रपटाचे प्रदर्शन दीर्घकाळ रखडले.जवळपास तीन वर्षांच्या कायदेशीर प्रक्रियेनंतर निर्मात्यांनी कोणतेही कट स्वीकारण्याऐवजी चित्रपटाचे नाव बदलून ‘सतलज’ ठेवले आणि तो थेट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, प्रदर्शनानंतर अवघ्या दोन दिवसांतच भारतातील स्ट्रीमिंग थांबवण्यात आल्याने या चित्रपटाभोवती पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असतानाच तो अचानक हटवण्यात आल्याने दिलजीत दोसांझचे चाहते निराश झाले आहेत. आता ‘सतलज’ भारतात पुन्हा कधी स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.