नागपूर,
Shivchhatrapati Lifetime Achievement Award नागपूरचे माजी महापौर, राज्य शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी आणि ज्येष्ठ क्रीडा संघटक स्वर्गीय अटलबहादूरसिंग यांच्या कार्यावर आधारित अटलबहादूरसिंग गौरवांकाचे लोकार्पण ज्योतिबा शारीरिक शिक्षण महाविद्यालयात करण्यात आले.
खेल खिलाडी खेलचे संपादक तथा शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी संजय लोखंडे यांनी तयार केलेल्या गौरवांकाचे प्रकाशन महाविद्यालयाचे प्राचार्य विजय दातारकर यांच्या हस्ते झाले. यावेळी अभय चोरघडे, राजू राऊत यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.Shivchhatrapati Lifetime Achievement Awardयावेळी विजय दातारकर यांनी अटलबहादूरसिंग यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान अतुलनीय असल्याचे सांगत त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.
सौजन्य:अभय चोरघडे,संपर्क मित्र