युरोपच्या शिखरावर फडकला तिरंगा

सिक्कीमच्या शेरिंगचा परदेशात डंका सर केले युरोपमधील सर्वोच्च शिखर

    दिनांक :06-Jul-2026
Total Views |
गंगटोक
mountaineer आजवर अनेक भारतीयांनी जागतिक स्तरावर आपल्या कामगिरीने देशाची मान उंचावली आहे. असाच पराक्रम एका भारतीय गिर्यारोहकाने केला आहे. सिक्कीमच्या गिर्यारोहक शेरिंग चोडेन यांनी माऊंट एल्ब्रस सर केले.
 
 
sherpa
mountaineer स्थानिक वेळेनुसार सकाळी 7.30 वाजता त्या 5,642 मीटर उंचीच्या या शिखरावर पोहोचल्या आणि युरोपमधील सर्वोच्च शिखर यशस्वीपणे पार केले. ‘सेव्हन समिट्स’ मोहिमेतील हे त्यांचे दुसरे यश आहे. हे ध्येय पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रत्येक खंडातील सर्वोच्च शिखर सर करावे लागणार आहे. यापूर्वी चोडेन यांनी ऑगस्ट 2025 मध्ये आफ्रिकेतील माऊंट किलिमंजारो सर केले होते. आता दोन शिखरे सर झाली असून, आणखी पाच शिखरे बाकी आहेत.
mountaineer सिक्कीम माउंटेनिअरिंग असोसिएशनने या आठवड्यात त्यांच्या या मोहिमेच्या यशाची पुष्टी केली. चोडेन यांची जिद्द दर्शवणारी ही कामगिरी असल्याचे सांगत, असोसिएशनने नमूद केले की, या यशातून उंच पर्वतांवरील चढाईसाठी आवश्यक असलेली चोडेन यांची चिकाटी आणि सहनशक्ती दिसून येते. तसेच यामुळे स्थानिक खेळाडूंच्या नवीन पिढीला या खेळाकडे वळण्याची प्रेरणाही मिळते.