वर्धा
school-shutdown-protes शिक्षक अभियोग्यता परीक्षा (टीईटी) ने निर्माण झालेली सेवा विषयक अस्थिरता, पदोन्नतीची हिरावलेली संधी, संच मान्यता धोरण, बीएलओ नियुक्ती संबंधाने राज्य शासनाच्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ राज्यातील शाळा गुरुवार ९ जुलै रोजी शिक्षकांच्या सामूहिक रजेच्या माध्यमातून बंद ठेवण्यासह मुंबई येथे आंदोलन करण्यात येणार आहे.
school-shutdown-protes महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना, शिक्षक संघटना समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र टीईटी/सीटीईटी उत्तीर्ण शिक्षक कृती समिती, महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा शिक्षक संघटना, शैक्षणिक व्यासपीठ, मुख्याध्यापक संघ व अन्य समविचारी शिक्षक संघटनांच्या संयुक्त वतीने राज्यव्यापी आंदोलन होणार आहे.
school-shutdown-protes टीईटी समकक्ष पात्रता परीक्षा आयोजित करण्यात यावी. प्राथमिक शिक्षकांना सर्व प्रकारच्या अशैक्षणिक कामातून पूर्णपणे मुक्त करावे, यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी राज्यात राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन करण्यात येणार आहे.