गर्भाशयमुखाच्या कर्करोगाविषयी शासनाचे प्रयत्न

प्रतिबंधात्मक आरोग्य मोहिमेला गती-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

    दिनांक :06-Jul-2026
Total Views |
बारामती,
sunetra ajit pawar गर्भाशयमुखाच्या कर्करोगाविषयी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक आरोग्य मोहिमेलाही राज्यशासन गती देत असल्याची माहिती राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली.
 

sunetra ajit pawar cervical cancer awareness campaign maharashtra health initiative baramati event 
माता-भगिनी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची काळजी घेतात; परंतू स्वतःच्या आरोग्याची तपासणी पुढे ढकलतात. ही मानसिकता बदलली पाहिजे.असेही त्या म्हणाल्या.'आदिशक्ती' व 'टू व्हील्स ऑफ होप सायकल बँक' उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील एक दशलक्ष विद्यार्थिनींसाठी सायकल वितरण अभियानाचा ग. दि. मा. सभागृह, विद्यानगरी येथे करण्यात आलेल्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी खासदार तथा ज्येष्ठ समाजसेविका पद्मविभूषण सुधा मूर्ती, खासदार स्वाती मालीवाल, जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, कृषी व पशु संवर्धन समिती सभापती अमोल नलावडे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अंकिता पाटील, पंचायत समिती सभापती किरण तावरे, उप सभापती शुभांगी आगवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपमुख्यमंत्र्यांचे धोरणविषयक सल्लागार डॉ. संतोष भोसले, नगराध्यक्ष सचिन सातव, उपाध्यक्ष श्वेता नाळे, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर, संस्था व सीएसआरचे प्रतिनिधी, नागरिक आदी उपस्थित होते.यावेळी खासदार मुर्ती,मालीवाल,जगदाळे यांनी आपले विचार व्यक्त केले.मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी प्रास्तविक केले.
 
शाळा पायाभूत सुविधा हस्तांतरण....
 
यावेळी जिल्हा परिषदेच्या २४० पेक्षा अधिक शाळांमध्ये डिजिटल वर्गखोल्यांचे हस्तांतरण, ८० पेक्षा अधिक शाळांमध्ये स्टेम (एसटीइएम) प्रयोगशाळा तसेच १० शाळांमध्ये पीआय प्रयोगशाळा, जि. प. शाळा वढाणे केंद्र सुपे आणि ८ शाळांमध्ये 'वॉश'(पाणी, स्वच्छता व शौचालय) सुविधांचे हस्तांतरण करण्यात आले. 'आदिशक्ती' व 'टू व्हील्स ऑफ होप सायकल बँक' उपक्रमाअंतर्गत २ हजार विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले.
 
 
जिल्हा परिषद आणि विविध संस्थांमध्ये सामंजस्य करार..
 
यावेळी जिल्हा परिषद व विविध संस्थांमध्ये सामंजस्य करार करण्यात आले. यात 'आयुका'समवेत जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना नासा, इस्रो, ईसा (युरोपियन स्पेस एजन्सी) संस्थांना शैक्षणिक भेट उपक्रम बाबत सामंजस्य करार करण्यात आला. ज्ञानप्रबोधिनीबरोबर विद्यार्थी देवाण-घेवाण कार्यक्रमबाबत, 'टीस'समवेत (टीआयएसएस) ग्लोबल गुरुजी प्रोग्रामबाबत, देश अपनाये सहयोग फाऊंडेशनसमवेत बाल संसद उपक्रमाबाबत सामंजस्य करार करण्यात आला. तसेच 'सेलको' समवेत अंगणवाडी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सौर विद्युतीकरणबाबत सामंजस्य करार करण्यात आला.