पावसाच्या छायेत तुकोबांची पालखी; देहूत गर्दी टाळा!

सुनेत्रा पवारांचे आवाहन

    दिनांक :07-Jul-2026
Total Views |
पुणे,
Avoid crowds in Dehu आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहू येथे संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण झाली असली, तरी मुसळधार पावसामुळे यंदाचा सोहळा विशेष खबरदारीत पार पडणार आहे. गेल्या चोवीस तासांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे देहू परिसरातील परिस्थिती बदलली असून, वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत पालखी प्रस्थान मर्यादित उपस्थितीत आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी देहू येथे उपस्थित राहणार आहेत. त्यांनी वारकऱ्यांना मोठ्या संख्येने देहूत गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. संभाव्य पूरस्थिती आणि सतत सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
 
Avoid crowds in Dehu
 
देहू परिसरात पोलीस, महसूल विभाग, आरोग्य यंत्रणा तसेच आपत्ती व्यवस्थापन पथकांना सतर्क ठेवण्यात आले आहे. गर्दी नियंत्रणासाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारीही प्रशासनाने केली आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही तासांतही मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे अनावश्यक प्रवास टाळावा, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यंदाची आषाढी वारी भक्तिभावासोबतच सुरक्षिततेची जबाबदारी लक्षात घेऊन पार पाडण्यावर भर दिला जात आहे.