कुरखेडा,
mungate college दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोलीद्वारा संचालित स्थानिक श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाच्या रोजगार मार्गदर्शन केंद्राद्वारे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची निवड लायर्ड मेंटल्स आणि एनर्जी लिमिटेडच्या कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रात झालेली आहे.
लायर्ड मेटल्स आणि एनर्जी लिमिटेड, कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र गडचिरोली येथे मुलींसाठी व गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी 18 ते 35 या वयोगटातील पदवीधारक विद्यार्थ्यांसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात श्री गोविंदराव मुनघाटे महाविद्यालयातील ज्योती राऊत, सुप्रिया सहारे, सलोनी दोणाडकर, ऐश्वर्या हलामी, प्रणाली गहाणे, सानिका हलामी, निशा पूडो, पूजा नैताम, साधना वटी, श्रुती सहारे, रोहिणी पाटणकर या विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या होत्या. या संपूर्ण विद्यार्थ्यांचे या रोजगार मेळाव्यात निवड झालेली असून त्यांना दोन महिन्याच्या प्रशिक्षण गडचिरोली येथे दिल्या जात आहे. त्यानंतर त्यांच्या कौशल्यावर आधारित रोजगार उपलब्ध करून देऊन रोजगाराची संधी दिल्या जाणार आहे. महाविद्यालयाचे रोजगार मार्गदर्शन केंद्राचे उपक्रमशील प्रा. डॉ. गुणवंत वडपल्लीवार यांच्या अपार प्रयत्नातून अकराही विद्यार्थ्यांची निवड या सदर कंपनीचे झालेली आहे.
महाविद्यालयाचा mungate college रोजगार मार्गदर्शन केंद्र हा अतिशय संपन्न, उपक्रमशील, हमखास रोजगार देणारा केंद्र म्हणून ओळखले जाते. या केंद्राद्वारे यापूर्वीही राज्यातील, देशातील विविध कंपनीमध्ये हाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेले आहेत. याचे संपूर्ण श्रेय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, उपप्राचार्य पी. एस. खोपे, उपप्राचार्य डॉ. अभय साळुंखे तसेच रोजगार मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख डॉ. गुणवंत वडपल्लीवार यांना दिले आहे.