अर्जून कपूरची बहीण अडकली विवाहबंधनात

    दिनांक :08-Jul-2026
Total Views |
मुंबई
anshula kapoor लोकप्रिय बॉलीवूड दिग्दर्शक बोनी कपूर यांची मुलगी आणि अभिनेता अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर हिने ६ जुलै रोजी रोहन ठक्कर याच्याशी विवाह केला. या विवाहसोहळ्यातील छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून नवदांपत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. समोर आलेल्या फोटोंमध्ये अंशुला आणि रोहन अत्यंत आनंदी आणि उत्साही दिसत आहेत.
 

arjun kapoor 
अंशुला आणि रोहन यांच्या प्रेमकथेची सुरुवात एका डेटिंग ॲपवरून झाली होती. सुरुवातीला दोघांमध्ये मैत्री निर्माण झाली आणि कालांतराने त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.जुलै २०२६ मध्ये रोहनने अंशुलाला लग्नाची मागणी घातली होती. त्यावर अंशुलानेही तत्काळ होकार देत दोघांचा साखरपुडा पार पडला.यानंतर सोमवारी या जोडप्याने मुंबईतील ताज लँड्स एंड येथे पारंपरिक पद्धतीने विवाहसोहळा पार पाडला. गेल्या काही anshula kapoor  दिवसांपासून अंशुला आणि रोहन लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर त्या चर्चांवर शिक्कामोर्तब करत दोघांनी विवाह करून नव्या आयुष्याची सुरुवात केली.मेहंदी आणि चुडा समारंभापासून ते लग्नसोहळ्यापर्यंत कपूर कुटुंबाने प्रत्येक क्षणाचा मनमुराद आनंद लुटला. दरम्यान, अंशुला आणि रोहन यांच्या लग्नातील विविध छायाचित्रांनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला असून चाहत्यांकडून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.