आर्वी,
arvi-purushottam-lodge : शहरातील बस स्थानक जवळील साईनगरातील पुरुषोत्तम लॉजच देहविक्रीचा व्यवसाय करून घेत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकून एका महिलेला ताब्यात घेतले. लॉजमालक पुरुषोत्तम रावलानी याच्याविरुद्ध आर्वी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
शहरातील पुरुषोत्तम लॉजवर देहव्यापार सुरू असल्याची कुणकुण लागताच पोलिसांनी सापळा रचला. बनावट ग्राहक पाठवून घटनेची सत्यता जाणून घेतली. पोलिसांनी बोगस ग्राहक लॉजमध्ये पाठविला. बोगस ग्राहकाकडून प्राप्त माहितीवरुन पुरुषोत्तम अतिथी गेस्ट हाऊसच्या खोली क्रमांक २०८ मध्ये पोलिसांनी धाड टाकली. खोलीत बोगस ग्राहकासोबत महिला आढळून आली. महिलेला ५०० रुपये आणि लॉज मालकाला खोलीचे ५०० रुपये दिल्याचे सांगितले. तसेच १ ते ७ जूनपर्यंत गेस्ट हाऊसमध्ये राहणार्या लोकांचे रजिस्ट्रेशन फॉर्म जप्त करण्यात आले.