बुलढाणा,
buldhana-news : गेल्या आठ दिवसांपासून जिल्हा भरात सर्वदूर संततधार पावसाची हजेरी असली तरी मध्यम मोठ्या प्रकल्पात याशिवाय पिण्याच्या पाण्याचे संकट दुर करण्यासाठी पाणी पुरवठा करणार्या धरणांना पिण्याच्या पाण्यासाठी पावसाची प्रतिक्षा आहे. बुलढाणा शहर व १३ गावांना पाणीपुरवठा करणार्या येळगाव धरणात दि. ८ जुलै रोजी ३५ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. येत्या जुलै महिन्यात होणार्या पावसाने हे धरण ५० टक्केच्या वर भरणार आहे. १०० टक्के भरण्यासाठी दमदार पावसाची प्रतिक्षा आहे.
मोठा प्रकल्प नळगंगा (५१.९०) टक्के, पेनटाकळी (३९.३७), एकूण मोठे प्रकल्प ३ (२६.७६) मध्यम प्रकल्प ज्ञानगंगा (४६.९), मस (२६.४०), कोराडी(४०.६१), पलढग (१३.४५), मन (२४.२७), तोरणा (१३.४३), उतावळी (४३.६६) एकूण मध्यम प्रकल्प सात त्यांची टक्केवारी (३३.३६) टक्के एकूण लघू प्रकल्प ४१ त्यांची टक्केवारी (१२.८२) टक्के, येळगाव प्रकल्प ३५ एवढी टक्केवारी आहे.