कर्जबाजारी शेतकर्‍याची गळफास लावून आत्महत्या

    दिनांक :08-Jul-2026
Total Views |
मानोरा,
suicide तालुयातील सोमनाथनगर येथील शेतकरी रायसिंग मंगु राठोड ( वय ६० ) यांनी सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून ८ जुलै रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घराच्या मागील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमनाथनगर येथील शेतकरी रायसिंग राठोड यांच्या नावाने २ एकर शेती आहे.
 

debt ridden farmer dies by suicide in manora amid crop losses and financial stress 
मागील तीन ते चार वर्षापासून सततची नापिकीमुळे शेती, बचत गटाचे, उसनवारी व सावकारी कर्ज अंगावर होते. कर्जाच्या विवंचनेत नेहमी चिंताग्रस्त राहत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. कुटुंबात पत्नी, एक मुलगा, सून असा परिवार असुन कर्ज काढून तीन मुलींचे लग्न केले आहे. सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून बुधवारी, ८ जुलै रोजी सकाळच्या सुमारास घरामागील झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. मनमिळावू स्वभावाचे शेतकरी रायसिंग राठोड यांनी गळफास घेतल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी मर्गचा गुन्हा दाखल करून अधिक तपास करीत आहे.