अमरावती,
mangesh-gondavale : अमरावती महापालिकेच्या आयुक्तपदी डाॅ. मंगेश गोंदावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान आयुक्त वर्षा लढ्ढा यांची बदली करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून नव्या आयुक्तांची नियुक्ती होईल अशी चर्चा मनपाच्या वर्तुळात हाेती. अखेर बुधवारी संध्याकाळी वर्षा लढ्ढा यांच्या बदलीचे आदेश धडकले.
डाॅ. मंगेश गोंदावले हे काही दिवसांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. अमरावती महापालिका आयुक्तपद उन्नत करून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी छत्रपती संभाजी नगर येथे सिडकोचे प्रमुख म्हूणन काम केले आहे. वर्षा लढ्ढा यांची अवघ्या तीन महिन्यांतच बदली झाली आहे. त्यांच्याकडे महिला व बालविकास आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.