‘मधुघट’ने रसिकांना दिला सुरेल आनंद

    दिनांक :08-Jul-2026
Total Views |
नागपूर,
madhughat सोहम संस्थेच्या वतीने आयोजित आणि गीत सौरभ संगीत ॲकॅडमीतर्फे सादर करण्यात आलेला कविवर्य भा. रा. तांबे यांच्या गीतांवर आधारित ‘मधुघट’ हा संगीत कार्यक्रम ४ जुलै रोजी सोहम सभागृहात उत्साहात पार पडला. सुरेल गीतांनी सजलेल्या या कार्यक्रमाने रसिकांना श्रवणतृप्ततेचा आनंद दिला. कार्यक्रमात सुचित्रा कातरकर, पद्मजा सिन्हा, अश्विनी लुले, प्रतीक्षा पट्टलवार, दीपाली पनके, मेधा हरिदास, विजय देशपांडे, आर्या देशपांडे आणि सुवर्णरेखा पाटील यांनी भा. रा. तांबे यांच्या अजरामर गीतांचे सादरीकरण केले. त्यांना आर्य पुराणकर, रवी सातफळे आणि तुषार विघ्ने यांनी उत्कृष्ट साथसंगत दिली. तसेच डॉ. माधुरी वाघ यांनी भा. रा. तांबे यांच्या कवितांचे प्रभावी अभिवाचन केले.
 
madhughat
 
यावेळी सुप्रसिद्ध कवयित्री व गायिका सुचित्रा कातरकर यांच्या मुलाखतीने कार्यक्रमात विशेष रंगत आणली. संपूर्ण कार्यक्रमाने उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना आनंदाची अविस्मरणीय अनुभूती दिली. कार्यक्रमाचे निवेदन आणि निर्मिती गीत सौरभ संगीत ॲकॅडमीच्या संस्थापक-अध्यक्षा प्रा. उज्ज्वला अंधारे यांनी खुसखुशीत शैलीत केले, तर कार्यक्रमाची संकल्पना सूरसप्तक संगीत संस्थेच्या अध्यक्षा सुचित्रा कातरकर यांची होती. मोहन सरवटे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सोहम संस्थेच्या अध्यक्षा वर्षा मनोहर आणि मोहन सरवटे यांचे विशेष सहकार्य लाभले. मेधा हरिदास यांनी आभार मानले. कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती.
सौजन्य: वर्षा किडे कुळकर्णी, संपर्क मित्र