कारखेड्यातील अंधारलेल्या घरात महावितरणमुळे उजेड

    दिनांक :08-Jul-2026
Total Views |
तभा इफेट
मानोरा,
karkheda तालुयातील कारखेडा येथील वार्ड क्र.१ मधील चार घरे तीन दिवसांपासून अंधारात होती. वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध होताच व स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठपुरावा केल्याने महावितरण प्रशासनाने तातडीने हालचाल करून तात्पुरत्या स्वरूपात वीजपुरवठा सुरू केला. यातील एका घरात पक्षाघात झालेली वृद्ध महिला, लहान बालके व शाळकरी मुले राहत असल्याने वीज नसल्याने त्यांचे प्रचंड हाल होत होते.
 

karkheda 
पावसाळ्यात अंधारामुळे साप-विंचवाची भीती व डासांचा त्रास सहन करावा लागत होता. सामाजिक कार्यकर्त्यांनी वीज कार्यालयातील उप अभियंत्यांशी संपर्क साधून समस्येचे गांभीर्य पटवून दिले. अखेर महावितरणच्या कर्मचार्‍यांनी निलेश राठोड घटनास्थळी येऊन तांत्रिक बिघाड दुरुस्त केला व घरांना वीज जोडणी दिली. वीज येताच कुटुंबीयांच्या चेहर्‍यावर समाधान दिसून आले. उपरोक्त वीज ग्राहकांच्या घराच्या पाठीमागे मोठाली झाडे व झुडुपे वाढलेली आहे, ज्यामुळे मागून वाहत असलेला नाला धोकादायक बनलेला आहे. स्थानिक प्रशासनाने ही झाडे झुडपे तोडून कायमची स्वच्छता करण्याची मागणी सुद्धा या निमित्ताने पुढे येत आहे.तीन दिवसांनंतर महावितरणने वीज सुरू केल्याने त्यांना दिलासा मिळाला.