दूषित पाण्याने मानेवाडा त्रस्त

    दिनांक :08-Jul-2026
Total Views |
नागपूर,
contaminated water महापालिकेच्या ओसीडब्ल्यू (OCW) कंपनीमार्फत हनुमाननगर झोनअंतर्गत मानेवाडा परिसरातील अनेक वस्त्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पिवळसर व दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला असून संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. श्रीहरी नगर क्र. १, २ व ३, सिद्धार्थनगर, ओंकारनगर, सेवादल नगर, सद्भावना नगर, स्वराज कॉलनी, विणकर वसाहत, विणकर कॉलनी तसेच ओंकारनगर जलकुंभाद्वारे पाणीपुरवठा होणाऱ्या इतर भागांमध्ये ही समस्या निर्माण झाली आहे. पुरवठा होणारे पाणी पिण्यास अयोग्य असून आंघोळ, कपडे धुणे तसेच इतर घरगुती वापरासाठीही ते योग्य नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
 
contaminated water
 
या प्रकरणी ऑनलाइन तक्रार दाखल करण्यात आली असून ओसीडब्ल्यू कंपनीने दूषित पाणीपुरवठा होत असल्याची बाब मान्य केली आहे. संबंधित अभियंत्याने पाइपलाइनला गळती (लीकेज) तसेच काही ठिकाणी चोक-अप झाल्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे सांगितले असून, दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेऊन स्वच्छ पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, नागरिकांना तातडीने स्वच्छ, सुरक्षित व पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून द्यावे, दूषित पाणीपुरवठ्याचे मूळ कारण त्वरित दूर करून प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जागरूक नागरिक डॉ. सोहन चवरे यांनी केली आहे.
सौजन्य: डॉ. सोहन चवरे, संपर्क मित्र