इंडोनेशियात महामृत्यूंजय मंत्राचा जप

प्राचीन शिवमंदिरात मोदींची महापूजा

    दिनांक :08-Jul-2026
Total Views |

 

जकार्ता
modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियाच्या तीन दिवसीय दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी योग्याकार्ता येथील प्राचीन प्रम्बनन शिवमंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिरात महापूजा करत महामृत्यूंजय मंत्राचा जप केला. यावेळी शेकडोच्या संख्या भारतीय वंशाचे हिंदू नागरिक उपस्थित होते.
 
modi mandir
 

modi इंडोनेशियातील लोकांनी प्राचीन पवित्र मंदिराची काळजी घेतली, तसेच हे मंदिर भावी पिढ्यांसाठी जतन केले. कैलाश मानसरोवरपासून प्रम्बनन मंदिरापर्यंत आता महामृत्युंजय मंत्र ऐकू येत आहे. मंदिराचे जतन केल्याबद्दल इंडोनेशियाच्या लोकांचे आभार मानतो, असे प्रतिपादन मोदी यांनी केले. यावेळी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो उपस्थित होते. मोदी आणि प्रबोवो यांनी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून सूचीबद्ध असलेल्या प्रम्बनन मंदिराच्या संवर्धन आणि जीर्णोद्धार प्रकल्पाचे उद्घाटन केले. भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील सांस्कृतिक सहकार्यातील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे मोदी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.


मंदिराचा काय आहे इतिहास ?

modi हे मंदिर ९व्या शतकात बांधले गेले आणि इंडोनेशियातील सर्वात मोठे हिंदू मंदिर संकुल आहे. भगवान शिवाला समर्पित असलेल्या या मंदिराच्या भव्य शिखरांवर शिव, विष्णू आणि ब्रह्मा यांच्या प्रतिमा आहेत. संपूर्ण संकुलात रामायणातील प्रसंग चित्रित केली आहेत. संकुलाच्या मध्यभागी ४७ मीटर उंच असलेले भव्य शिव मंदिर आहे. हे जगातील सर्वात मोठ्या हिंदू मंदिरांपैकी एक मानले जाते.


भारत करणार जीर्णोद्धार

modi भारत या मंदिराचा जीर्णोद्धार करणार आहे. यासाठी इंडोनेशियासोबत करार करण्यात आला. महापूजेत सहभागी होण्यासाठी आलेल्या नागरिकांना संबोधित करताना मोदी म्हणाले, महानदीत केळीच्या खोडांपासून बनवलेल्या लहान बोटी सोडण्याची परंपरा असो, ‘वायांग कुलित’च्या माध्यमातून महाभारताचे सादरीकरण असो किंवा देवी श्रीची पूजा असो, प्रत्येक परंपरा भारत आणि इंडोनेशियामधील शतकानुशतके जुन्या सांस्कृतिक संबंधांची जाणीव होते.