अनिल कांबळे
नागपूर,
road accident नागपूर ग्रामीण पोलिसांनी जानेवारी ते जून २०२६ या कालावधीत रस्ते अपघातांमध्ये लक्षणीय घट घडवून आणत राज्यात दुसरे स्थान मिळविले आहे. सातत्यपूर्ण नियोजन, माहिती-आधारित (डेटा-ड्रिव्हन) उपाययोजना आणि प्रभावी अंमलबजावणीमुळे ही उल्लेखनीय कामगिरी साध्य झाली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, जानेवारी ते जून २०२५ च्या तुलनेत २०२६ च्या याच कालावधीत रस्ते अपघातांतील मृत्यूंच्या संख्येत २३ टक्के, जखमींच्या संख्येत ११ टक्के, तर एकूण रस्ते अपघातांमध्ये १८ टक्के घट झाली आहे.

देशातील रस्ते अपघातांच्या road accident दृष्टीने संवेदनशील असलेल्या अव्वल १०० जिल्ह्यांमध्ये नागपूर जिल्ह्याचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर रस्ते अपघातांमुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी 'झिरो फॅटॅलिटी डिस्ट्रिक्ट (झेडएफडी)' उपक्रम राबविण्यात येत असून, त्यासाठी सेव्हलाईफ फाउंडेशनचे तांत्रिक सहकार्य घेतले जात आहे. हा उपक्रम केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या देखरेखीखाली राबविला जात आहे. नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलिसांनी अपघात प्रतिबंध, प्रभावी वाहतूक अंमलबजावणी, जनजागृती आणि अपघातप्रवण ठिकाणांचे वैज्ञानिक विश्लेषण यावर आधारित सर्वसमावेशक धोरण अवलंबले आहे. दरम्यान, जून २०२६ महिन्यातील कामगिरीही उल्लेखनीय ठरली आहे. जून २०२५ च्या तुलनेत जून २०२६ मध्ये रस्ते अपघातांतील मृत्यूंमध्ये ४५ टक्के, जखमींमध्ये १४ टक्के, तर एकूण अपघातांमध्ये ३३ टक्के घट नोंदविण्यात आली आहे.
पासपोर्ट फोटो घ्यावा हर्ष पोद्दार यांचा
प्रभावी वाहतूक अंमलबजावणी, अपघातप्रवण ठिकाणांचे शास्त्रीय विश्लेषण, विविध यंत्रणांमधील समन्वय आणि झिरो फॅटॅलिटी डिस्ट्रिक्ट उपक्रमांतर्गत अभियांत्रिकी सुधारणा, कायद्याची कठोर अंमलबजावणी, जनजागृती आणि तातडीच्या आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे ही यशस्वी कामगिरी शक्य झाली आहे.
- हर्ष पोद्दार (पोलिस अधीक्षक, नागपूर ग्रामीण)