कारंजा (घा.),
nitin-daryapurkar : शिवसेनेचे आर्वी विधानसभा प्रमुख तथा नगरपंचायतचे माजी उपाध्यक्ष नितीनदर्यापूरकर यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी व सेवाभावी उपक्रमांनी साजरा करण्यात आला. संत गजानन महाराज देवस्थान येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संत गजानन महाराज संस्थानचे पदाधिकारी, सदस्य तसेच नितीनदर्यापूरकर मित्रपरिवारातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरातील विविध शाळांमध्ये विद्याथ्र्यांना शालेय भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळं वाटप करण्यात आले. यावेळी नितीन दर्यापूरकर यांच्यासह नपं अध्यक्ष स्वाती भिलकर, उपाध्यक्ष भगवान बुवाडे, सभापती संजय मस्की, कमलेश कठाणे, नगरसेवक राजेंद्र लाडके, हेमंत बन्नगरे, विशाल इगळे, निता मिश्रा, रंजना ढबाले, मधुमाला दुधकवरे, सुजित चौधरी, तिकाराम मस्की, उमेश पायघन, विजय चेर, अजय राऊत, सचिन नासरे, नितेश वैद्य, राकेश राऊत, श्रवण वलगावकर, संदेश भिलकर, आदींसह नितीनभाऊ मित्रपरिवारातील सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.