नागपूर,
state level poetry competition सामाजिक भान जपणारे लेखक, कवी आणि विचारवंत प्रवीण बागडे यांच्या कवितेला विदुमाऊली बहुउद्देशीय संस्था, कनारखेड (जि. बुलढाणा) आणि काव्यसागर साहित्य मंच, शेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय काव्यस्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेतर्फे त्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
राज्यभरातील अनेक कवींच्या सहभागातून झालेल्या या स्पर्धेत प्रवीण बागडे यांच्या सामाजिक जाणीवा जागृत करणाऱ्या, आशयघन आणि विचारप्रवर्तक कवितेची परीक्षकांनी प्रथम क्रमांकासाठी निवड केली. त्यांच्या सातत्यपूर्ण साहित्यसाधनेची आणि दर्जेदार लेखनाची ही महत्त्वपूर्ण दखल मानली जात आहे.
प्रवीण बागडे हे सामाजिक, राजकीय आणि समकालीन विषयांवर परखड लेखन करणारे लेखक म्हणून परिचित आहेत. त्यांच्या कविता, लेख आणि वैचारिक लिखाणाचे विविध वृत्तपत्रे व नियतकालिकांत सातत्याने प्रकाशन होत असते. या यशाबद्दल साहित्य, सामाजिक, पत्रकारिता तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून, हा सन्मान आगामी साहित्यनिर्मितीसाठी अधिक प्रेरणादायी ठरेल, अशी भावना प्रवीण बागडे यांनी व्यक्त केली.
सौजन्य: प्रवीण बागडे, संपर्क मित्र