वर्धा,
ratnibai school शाळेच्या वर्गखोल्यांत जुळलेली मैत्री तब्बल तीन दशकांनंतरही सामाजिक बांधिलकी जपत असल्याचे सुंदर उदाहरण रत्नीबाई विद्यालयाच्या १९९० च्या बॅचमधील माजी विद्याथ्र्यांनी घालून दिले. या मित्रांनी हनुमान टेकडी परिसरातील मुंडले सांस्कृतिक सभागृहाच्या परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.शुक्रवार ३ रोजी सकाळी आयोजित या उपक्रमात विविध प्रजातींची रोपं लावण्यात आली. केवळ वृक्षारोपण करून न थांबता, लावलेल्या रोपांचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे यासाठी प्रत्येक रोपाला वृक्ष संरक्षक कठडे लावण्यात आले.
या सामाजिक उपक्रमासाठी विनोद कुरंजेकर, सचिन डांगे, गिरीश चवडे, वीणा शेंडे आणि नयना दरणे यांनी आर्थिक सहकार्य केले. वृक्षारोपण प्रसंगी प्रवीण साठवणे, राम दुर्गे, पराग धोतरकर, लता खर्चे, पराग मिटकरी आणि मंदार अभ्यंकर उपस्थित होते.शालेय जीवनातील मैत्री केवळ आठवणी आणि भेटीगाठींपुरती मर्यादित न ठेवता, समाज आणि पर्यावरणासाठी काहीतरी करण्याच्या भावनेतून रत्नीबाई विद्यालयाच्या माजी विद्याथ्र्यांर्नीं राबविलेला उपक्रम कौतुकास्पद ठरला.