दिग्रसला शाळकरी मुलीची छेड

पाेलिसांकडून पाेक्साे अंतर्गत कारवाई

    दिनांक :08-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
दिग्रस,
schoolgirl-molested : येथील आठव्या वर्गात शिकत असलेल्या मुलीची एका भामट्याने मंगळवार, 7 जुलैला छेड काढत तिला नकाे त्या शब्दात हाक मारून दहशतीत आणल्याने चांगलीच खळबळ उडाली.
 
 
 
j
 
 
 
ताे भामटा विवाहित असून मुस्लिम गवळी असल्याचे समाेर आले. याच्या हातून झालेल्या गुन्ह्याला एकदा माफ करा, या मागणीसाठी रात्री उशीरापर्यंत येथील काही स्वयंभू समाजसेवक प्रयत्नात हाेते. मात्र त्याला त्वरित पाेलिसांच्या ताब्यात देण्याची तसदी घेतली नाही.
त्यामुळेच ठाणेदार वैद्यनाथ मुंडे यांनी त्या गुन्हेगार परिवारातील सदस्य आणि ताे जिथे कामाला हाेता येथील इसाणी ट्रेडर्सच्या मालकाला चाैकशीसाठी पाेलिस ठाण्यात आणून बसवताच त्याला ठाण्यात जमा करताे, इतरांना साेडा अशी विनंती केली.
 
 
दरम्यान, त्या अज्ञात गुन्हेगारावर ‘प्राेटेक्शन ऑफ चिल्ड्रेन ्राॅम सेक्शुअल ऑेन्सेस’ (पाेक्साे) अर्थात 18 वर्षांखालील सर्व मुला-मुलींना लैंगिक गुन्ह्यांपासून वाचवण्यासाठी भारत सरकारने 2012 मध्ये बनवलेला एक अतिशय कडक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास ठाणेदार वैद्यनाथ मुंडे करीत आहेत.