‘तारक मेहता का उल्टा चष्माच्या मेहताजींच्या मुलीचं लग्न

    दिनांक :08-Jul-2026
Total Views |
मुंबई
shailesh lodha ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेत तारक मेहताची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेले अभिनेते शैलेश लोढा यांच्या घरात सध्या आनंदाचे वातावरण आहे. त्यांची लाडकी लेक स्वरा लोढा हिचा विवाहसोहळा नुकताच मोठ्या थाटामाटात पार पडला. जोधपूर येथील प्रसिद्ध उमेद भवन पॅलेसमध्ये स्वराचा शाही विवाहसोहळा पार पडला असून, या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
 

shailesh lodha daughter swara lodha royal wedding attended by vicky kaushal 
या लग्नातील एका व्हिडीओने विशेष लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता विकी कौशल याची उपस्थिती पाहायला मिळत असून, तो शैलेश लोढा यांच्या वतीने विशेष पाहुणा म्हणून लग्नाला उपस्थित होता. लग्नसोहळ्यात विकी कौशल पांढऱ्या रंगाची शेरवानी-जॅकेट आणि काळ्या रंगाच्या पँटमधील स्टायलिश लूकमध्ये दिसत आहे.
व्हिडीओमध्ये शैलेश लोढा हे विकी कौशलचे स्वागत करताना आणि त्याची विविध पाहुण्यांसह तसेच कुटुंबीयांशी ओळख करून देताना दिसत आहेत. याशिवाय, आणखी एका क्लिपमध्ये विकी कौशल शैलेश लोढा यांचा फेटा व्यवस्थित करताना, वरातीचे स्वागत करताना आणि वधू स्वराला मिठी मारून तिचे अभिनंदन करताना दिसत आहे. लग्नाला उपस्थित पाहुण्यांसोबत विकीनेही या सोहळ्याचा मनमुराद आनंद घेतला.
दरम्यान, लग्नातील आणखी एका व्हिडीओमध्ये शैलेश लोढा यांचा भावनिक क्षण कैद झाला आहे. मुलीला मिठी मारताना ते भावूक झाल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यानंतर स्वरा लोढा आई-वडिलांसोबत तसेच आजी-आजोबांसोबत फोटोसाठी पोझ देतानाही दिसली.
स्वरा लोढाच्या विवाहसोहळ्याला उपस्थित असलेल्या सेलिब्रिटींमध्ये कवी कुमार विश्वास यांचाही समावेश होता. ते शैलेश लोढांच्या मुलीला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते. याशिवाय योगगुरू बाबा रामदेव यांनीही लग्नाला हजेरी लावली. लग्नाच्या एक दिवस आधी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा हेदेखील या सोहळ्यात दिसले होते. मात्र, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी या लग्नसोहळ्यात कुठेही दिसले नाहीत. त्यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
शैलेश लोढा आणि विकी कौशल shailesh lodha ‘ यांच्यातील मैत्रीही या सोहळ्याच्या निमित्ताने चर्चेत आली आहे. शैलेश लोढा यांनी विकीसोबतचा एक फोटो शेअर करत त्याचे कौतुक केले आहे. त्यांनी लिहिले, “ज्याचा अर्थ प्रचंड लोकप्रियता, अतुलनीय यश आणि सर्वदूर पसरलेली प्रसिद्धी असा होता.. विकी कौशलने हे सर्व कठोर परिश्रम आणि समर्पणाने मिळवलं आहे. तरीही त्याच्या मनाचा मोठेपणा अधिकच वाढला आहे. तो आजही पहिल्या दिवसाप्रमाणेच पाय जमिनीवर ठेवून आहे. हीच गोष्ट त्याला इतरांपासून वेगळं ठरवते. खूप खूप प्रेम विकी.”