पारवा बसस्थानकाची दुरवस्था

पांढरकवडा आगाराचे दुर्लक्ष

    दिनांक :08-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
पारवा,
parva-bus-station : घाटंजी तालुक्यातील 6 हजार लाेकसंख्येचे पारवा हे गाव राजकीय, सामाजिक व पर्यटनाच्या दृष्टीने 42 खेड्यांचे मुख्य केंद्र आहे. काँग्रेस कारकिर्दीत तत्कालीन परिवहन मंत्री शिवाजी माेघे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या येथील बस स्थानकाचे आजतागायत साधे खडीकरण किंवा डांबरीकरणही करण्यात आलेले नाही.
 
 
 
y8July-Parawa
 
 
सध्या या स्थानकाच्या दाेन्ही मुख्य प्रवेशद्वारांवर माेठमाेठे खड्डे पडले आहेत. येथून दरराेज धावणाèया 30 बस ेèयांच्या चालकांना प्रवाशांचा जीव मुठीत धरून कसरतीने गाड्या आत न्याव्या लागत आहेत. या मार्गावरून मांडवी-दारव्हा, यवतमाळ-आदिलाबाद, रामटेक-किनवट अशा अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात.
 
 
तसेच टिपेश्वर अभयारण्याच्या माथणी गेटवर जाणारे पर्यटक व चंद्रपूर महाकाली दर्शनासाठी जाणारे मराठवाड्यातील भाविक याच स्थानकाचा वापर करतात. मात्र येथील चिखल व खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे प्रवासी, विद्यार्थी व शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत. या गंभीर समस्येकडे आमदार राजू ताेडसाम यांनी तातडीने लक्ष देऊन निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.
खर्चाची मर्यादा ठरतेय अडथळा
 
 
याबाबत पांढरकवडा आगाराचे आगारप्रमुख आकाश काकडे यांच्याशी संपर्क साधला असता, पारवा स्थानकासाठी माेठ्या प्रमाणात मुरमाची गरज असल्याने मी वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केला आहे. डेपाे स्तरावर आम्हाला खर्च करण्याची मर्यादा केवळ 5 हजार रुपयांचीच असते. आज 5 हजार रुपयात किती मुरूम येईल ? तरीही माझ्या स्तरावर तात्पुरती दुरुस्ती मी करून घेणार आहे. तसेच, ग्रामपंचायतच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित हाेत नसल्याने ते पाणी बस स्थानकात येत आहे, याबाबत आम्ही ग्रामपंचायतलादेखील पत्र दिले आहे, असे त्यांनी सांगितले.