अंकारा,
Trump announces end of agreement तुर्कीची राजधानी अंकारा येथे झालेल्या नाटो शिखर परिषदेदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अमेरिका आणि इराणमधील सामंजस्य करार (एमओयू) आता कालबाह्य झाला असून, त्याला कोणतेही महत्त्व उरलेले नाही, असा दावा केला.पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ट्रम्प म्हणाले की, अलीकडील घडामोडींनंतर दोन्ही देशांमधील संबंध पूर्णपणे बदलले आहेत. त्यामुळे या कराराचे भवितव्य संपुष्टात आल्याचे मानले पाहिजे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, "माझा विश्वास आहे की सामंजस्य करार आता कालबाह्य झाला आहे.

ट्रम्प यांनी यावेळी इराणमधील अलीकडील अमेरिकी लष्करी कारवाईचाही उल्लेख केला. "काल रात्री आम्ही इराणमधील अत्यंत धोकादायक व्यक्तींवर अत्यंत शक्तिशाली हल्ला केला, असे सांगत त्यांनी ही कारवाई अमेरिकेच्या सुरक्षेसाठी आवश्यक असल्याचे नमूद केले. ही मोहीम पूर्ण ताकदीने राबवण्यात आल्याचाही त्यांनी दावा केला.इराणवर टीका करताना ट्रम्प म्हणाले, "ते आजारी आहेत, त्यांच्यात काहीतरी गडबड आहे. त्यांचे हे वक्तव्य अशा वेळी समोर आले आहे, जेव्हा अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव सातत्याने वाढत असून, अलीकडील लष्करी घडामोडींमुळे मध्य-पूर्वेतील परिस्थिती अधिक संवेदनशील बनली आहे.