पूर्णा मध्यम प्रकल्पाचे दोन दारे उघडले

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

    दिनांक :08-Jul-2026
Total Views |
चांदूरबाजार, 
purna-madhyam-project : अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील पूर्णा मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने बुधवारी, ८ जुलैला दुपारी ४ वाजता प्रकल्पाचे दोन दारे उघडून नदीपात्रात १५.५० घनमीटर प्रती सेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
 

amt 
 
 
मंगळवारी सकाळी ७ वाजेपर्यंत प्रकल्पातील जलाशयाची पातळी ४४९.५८ मीटर नोंदविण्यात आली असून उपयुक्त पाणीसाठा २५.१८ दशलक्ष घनमीटर झाला आहे. हा साठा प्रकल्पाच्या एकूण उपयुक्त क्षमतेच्या ७१.१९ टक्के आहे. या पृष्ठभूमीवर प्रशासनाने संबंधित सर्व शासकीय यंत्रणांना आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच पूर्णा नदीकाठावरील गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात अथवा पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळावे, असे आवाहन पूर्णा प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता सागर अलाटकर यांनी केले आहे.