हिंगणघाट शाखेत वर्धा नागरी बँकेचा वर्धापन दिन साजरा

    दिनांक :08-Jul-2026
Total Views |
हिंगणघाट,
wardha nagari banks वर्ध्याच्या आर्थिक प्रगतीचा विश्वासू स्तंभ असलेल्या वर्धा नागरी सहकारी बँकेने ५८ व्या वर्षांत पदार्पण केले. या निमित्ताने हिंगणघाट शाखेत वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 
 

wardha nagari banks 
 
 
प्रमुख पाहुणे म्हणून पालक संचालक विनोद मोहता आणि अतुल चिलबिलवार, संत तुकडोजी नागरी पत संस्थेचे उपाध्यक्ष व सहकार भारती वर्धा जिल्हा अध्यक्ष पत्रकार प्रभाकर कोळसे, विदर्भ नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष पत्रकार विजय राठी यांची विशेष उपस्थिती होती. ५७ वर्षांच्या प्रवासात बँकेने ग्राहकांना उत्कृष्ट, पारदर्शक आणि विश्वासार्ह सेवा देत सहकाराची भावना जपली आहे.wardha nagari banks ठेवीदारांचा विश्वास आणि कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळेच बँक उंचीवर पोहोचली असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले. कार्यक्रमाला संचालक मंडळ, कर्मचारी आणि बँकेशी जोडलेल्या सर्व ग्राहकांचे अभिनंदन करण्यात आले.