रुग्णवाहिकेतच महिलेची सुरक्षित प्रसूती

डॉक्टरांच्या तत्परतेने माता-बालक सुखरूप

    दिनांक :08-Jul-2026
Total Views |
रिसोड, 
woman-delivers-baby : १०८ रुग्णवाहीका पथकाने वेळेवर दाखविलेल्या तत्परतेमुळे महिलेची रुग्णवाहिकेतच सुरक्षित प्रसूती करून माता व नवजात बालकाचे प्राण वाचविले. ही घटना मंगळवार ८ जुलै रोजी सायंकाळी रिसोड-मोठेगाव मार्गावर घडली.
 
 

hjh 
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी ४.३१ वाजता मोठेगाव ता. रिसोड येथील निकिता लांडे यांना प्रसवकळा सुरू झाल्याने त्यांच्यासाठी १०८ आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेला कॉल करण्यात आला. त्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत रिसोड येथील एमएच १४, सीएल, ०८९९ क्रमांकाची १०८ रुग्णवाहिका मोठेगाव येथे दाखल झाली. गर्भवती महिलेला पुढील उपचारासाठी रिसोडकडे आणत असताना वाटेतच प्रसवकळा तीव्र झाल्याने रुग्णवाहिका सुरक्षित ठिकाणी थांबविण्यात आली. त्यानंतर डॉ. अजय नाईकवाडे यांनी आशा सेविका छाया कस्ते यांच्या सहकार्याने रुग्णवाहिकेतच निकिता लांडे यांची यशस्वी प्रसूती केली. प्रसूतीनंतर माता व नवजात बालक दोघांचीही प्रकृती चांगली असल्याचे सांगण्यात आले. या सेवेत रुग्णवाहिकेचे चालक विजय सरनाईक यांनीही तत्पर भूमिका बजावली. वेळेवर मिळालेल्या आपत्कालीन आरोग्य सेवेबद्दल कुटुंबीयांनी १०८ रुग्णवाहिका पथकाचे आभार मानले.
 
 
निकिता लांडे या गर्भवती महिलेस रुग्णवाहिकेतच तीव्र प्रसवकळा सुरू झाल्या. त्यामुळे प्रसंगावधान राखून आशा सेविका आणि रुग्णवाहिका चालकाच्या मदतीने रुग्णवाहिकेतच सुखरुप प्रसूतीसाठी आवश्यक उपाय योजना केल्या.
डॉ. अजय नाईकवाडे