मानोरा तालुयातील ३६ ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकाकडे

विकासकामांना लागला ब्रेक

    दिनांक :09-Jul-2026
Total Views |
मानोरा,
gram panchayats तालुक्यातील  ३६ ग्रामपंचायतीची मुदत संपल्यामुळे त्यावर प्रशासक नेमल्याने गावगाड्या च्या विकासाचा रथ थांबलां गेला असल्यामुळे नांगरीकात नाराजीचा सूर उमटत आहे. मानोरा तालुका हा डोगराळ भागात वसलेला व अंतंत्य मागास तालुका म्हणून शासन दप्तरी त्याची नोंद आहे. तालुयात एकून ७८ ग्रामपंचायती असून, १२ एप्रिल २०२४ मध्ये बोरव्हा, चौसाळा, दापुरा बु, दापुरा खु, फुलउमरी, गिरोली, जामदरा, घोटी, कार्ली, कोलार, पाळोदी, उमरी बु, उमरी खुर्द, सोमेश्वर नगर या १४ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यावर पंचायत समीतीच्या विस्तार व वरिष्ठ अधिकार्‍यांची प्रसासक म्हणून नेमणूक केली आहे. तर सन फेब्रुवारी २०२६ मध्ये रतनवाडी, सेवादास नगर, पारवा, गव्हा, अजनी, आमकीन्ही, विठोली, वरोली, तळप बु, हळदा, कोंडोली, मोहगव्हाण, कुपटा, वाईगोळ, इंझोरी, घामणी, गोडेगांव, आसोला बु, हिवरा बु., गादेगांव, शेदुरजना, कारखेडा या २२ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यावर संरपंच यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे.
 

36 gram panchayats in manora under administrators development works hit 
सध्या पावसाळा सुरु असून, गावात पाणी साचल्यामुळे रोगराई पसरण्याची शयता असते, तेव्हा गावकर्‍याचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी रस्त्यावर पाणी साचु नये, यासाठी मुरुम टाकावा लागतो, पिण्याचे स्वच्छ पाणी पुरवठा करणे, नाल्याची सफाईची कामे करणे, कुठे दुरुस्ती करणे यासाठी निधीची ग्रामपंचायतला गरज भासते. मात्र, प्रशासकावर आर्थिक निर्बंध असल्यामुळे आर्थिक तरतुद करुण कामे कठीण आहे.