मोबाईल जाळं नसतानाही संपर्क शक्य!

भारत संचार निगमचा नवा दूरसंचार संच चर्चेत!

    दिनांक :09-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली,
bsnl-launched-satellite-phone : भारत संचार निगमने दुर्गम आणि जाळ्याविना असलेल्या भागांमध्येही संपर्क साधता येईल असा नवा उपग्रहाधारित दूरसंचार संच उपलब्ध करून दिला आहे. या संचाची किंमत १ लाख ३४ हजार १६६ रुपये असून, त्याच्या वैशिष्ट्यांमुळे तो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
 
 

bsnl
 
 
हा संच सामान्य बुद्धिमान दूरध्वनीप्रमाणे नसून, त्यामध्ये छायाचित्रण यंत्रणा, सामाजिक माध्यमे किंवा विविध अनुप्रयोगांची सुविधा नाही. मात्र, मोबाईल जाळे पूर्णपणे नसलेल्या भागातही आवाजाद्वारे संभाषण आणि आपत्कालीन मदत संदेश पाठविण्याची सुविधा हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.
 
 
हा उपग्रहाधारित दूरसंचार संच प्रामुख्याने संरक्षण दल, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, सागरी क्षेत्रातील कर्मचारी तसेच अतिदुर्गम भागात कार्य करणाऱ्या संस्था आणि उद्योगांसाठी तयार करण्यात आला आहे. आवश्यक परवानग्या आणि नियमांचे पालन करूनच या सेवेचा वापर करता येतो.
 
 
भारत संचार निगमची ही सेवा सुरक्षित संकेतबद्ध संपर्क प्रणालीवर आधारित असून, मोबाईल मनोऱ्यांवर अवलंबून न राहता उपग्रहाच्या माध्यमातून संपर्क प्रस्थापित करते. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती, दुर्गम डोंगराळ भाग किंवा समुद्रातही संपर्क राखणे शक्य होते.
 
 
भारत संचार निगमने या सेवेचा विस्तार करण्यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणावर दूरसंचार सुविधा कार्यान्वित केल्या असून, दुर्गम भागांतील संपर्क व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात आहे