coconut oil केसांच्या योग्य वाढीसाठी आवश्यक असलेले पोषक घटक मिळणे गरजेचे असते. शरीराला आवश्यक पोषण मिळाले नाही तर त्याचा थेट परिणाम केसांच्या आरोग्यावर होतो. परिणामी केस कोरडे, निस्तेज आणि कमकुवत होऊ शकतात. अशावेळी अनेकजण केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या हेअर केअर उत्पादनांचा वापर करतात. मात्र, प्रत्येक वेळी या उत्पादनांचा अपेक्षित फायदा होईलच असे नाही. त्यामुळे घरच्या घरी उपलब्ध असलेल्या काही नैसर्गिक घटकांचा वापर करून केसांची निगा राखण्याचा पर्यायही अनेकजण निवडतात.
केसांच्या घनदाट वाढीसाठी आणि आरोग्य सुधारण्यासाठी खोबरेल तेलामध्ये काही नैसर्गिक पदार्थ मिसळून त्याचा वापर करता येतो. कडीपत्त्याची पाने खोबरेल तेलामध्ये मिसळल्यास खराब झालेल्या केसांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होऊ शकते. यासाठी खोबरेल तेलामध्ये कडीपत्त्याची पाने टाकून ते तयार करावे. त्यानंतर तेल थंड झाल्यावर गाळून घ्यावे आणि हलक्या हाताने केसांना मसाज करावा.
केस मुलायम आणि चमकदार coconut oil दिसण्यासाठी खोबरेल तेलात कोरफड जेल मिसळून वापरता येते. हे मिश्रण केसांना लावून रात्रभर ठेवावे आणि सकाळी स्वच्छ पाण्याने केस धुवावेत.केसांमध्ये कोंड्याची समस्या असल्यास मेथी दाण्यांचा वापर फायदेशीर ठरू शकतो. मेथी दाण्यांची पेस्ट खोबरेल तेलात मिसळून हलक्या हाताने केसांना मसाज केल्यास कोंड्याची समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते. तसेच मेथी दाण्यांमुळे केस लांब आणि घनदाट होण्यास मदत होते, असे मानले जाते.केसांची वाढ जलद होण्यासाठी खोबरेल तेलात कांद्याचा रस मिसळून लावण्याचाही वापर केला जातो. यामुळे बारीक आणि पातळ झालेल्या केसांना मजबुती मिळण्यास तसेच केसांची चमक वाढण्यास मदत होऊ शकते.केसांचे आरोग्य टिकवण्यासाठी बाह्य उपचारांबरोबरच संतुलित आहार, योग्य पोषण आणि नियमित काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
.