नागपूर,
Contaminated water हनुमाननगर झोन अंतर्गत मानेवाडा परिसरातील श्रीहरी नगर क्र. १, २ व ३, सिद्धार्थनगर, ओंकारनगर, सेवादल नगर, सद्भावना नगर, स्वराज कॉलनी, विणकर वसाहत, विणकर कॉलनी तसेच ओंकारनगर जलकुंभातून पाणीपुरवठा होणाऱ्या विविध वस्त्यांमध्ये मागील दोन दिवसांपासून पिवळसर व दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दूषित पाणी पिण्यास अयोग्य असून आंघोळ, कपडे धुणे तसेच इतर घरगुती कामांसाठीही त्याचा वापर करता येत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. त्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला असून नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.Contaminated waterयासंदर्भात ऑनलाईन तक्रार दाखल करण्यात आली असून ओसीडब्ल्यू कंपनीने दूषित पाणीपुरवठ्याची बाब मान्य केली आहे. संबंधित अभियंत्यांनी पाईपलाईनमधील गळती व काही ठिकाणी झालेल्या चोक-अपमुळे ही समस्या निर्माण झाल्याचे सांगत लवकरात लवकर दुरुस्ती करून स्वच्छ पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले आहे.दूषित पाणीपुरवठ्याचे कारण तातडीने दूर करून नागरिकांना सुरक्षित व पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून द्यावे, तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जागरूक नागरिक डॉ. सोहन चवरे यांनी केली आहे.
सौजन्य:डॉ. सोहन चवरे,संपर्क मित्र