दीनदयाल शोध संस्थान पुस्तकपेढीचा उपक्रम

    दिनांक :09-Jul-2026
Total Views |
नागपूर,
Deendayal Research Institute दीनदयाल शोध संस्थान पुस्तकपेढी तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी वही वितरण कार्यक्रम शुक्रवार, १० जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता बाल जगत प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमात नागपुरातील ३० ते ३५ शाळांमधील विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ व विचारवंत डॉ. बाबासाहेब नंदनपवार राहतील, तर समाजसेविका डॉ. अभिरुची पळसापुरे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील.
 

nikita 
 
यावेळी दीनदयाल शोध संस्थानचे प्रधान सचिव निखिल मुंडले, प्रकल्प प्रमुख अनुजा परचुरे, मार्गदर्शिका मीरा खड्डकार ,संस्थेचे अध्यक्ष अभिनंदन पळसापुरे, यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. Deendayal Research Institute तसेच विविध शाळांतील विद्यार्थी, शिक्षक आणि बाल जगत परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाला बाल जगत परिवारातील सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रकल्प संयोजिका उत्तरा नवरे यांनी केले आहे.
सौजन्य:निकिता लुटे,संपर्क मित्र