यवतमाळ,
Felicitation of Meritorious Students येथील आयटीसीच्या चौपाल सागर येथे दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत 70 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून लोकनायक बापूजी अणे विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापक छाया पांडे आणि चौपाल सागरचे संयोजक पीयूष झांबड उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी छाया पांडे यांनी, आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अत्यंत विचारपूर्वक व आपल्या आवडीचा अभ्यासक्रम निवडावा, असे आवाहन करून चौपाल सागरच्या उपक्रमाचे अभिनंदन केले. कार्यक्रमासाठी चौपाल सागरचे स्टोअर व्यवस्थापक दर्शन जोशी, लक्ष्मीकांत देशटवार तसेच संपूर्ण आयटीसी कर्मचाèयांनी परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा मिळाली असून शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्यास प्रोत्साहन मिळाले, अशी भावना व्यक्त करीत पालक आणि शिक्षकांनी चौपाल सागरच्या या उपक्रमाचे कौतुक केले.