अलर्ट जारी! राज्यात मुसळधार सरींनंतर पूरस्थिती

अनेक भागांना पाणीटंचाईचा फटका

    दिनांक :09-Jul-2026
Total Views |
मुंबई
heavy rainfal गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. संपूर्ण जून महिन्यात जितका पाऊस पडतो, तितकाच पाऊस अवघ्या सहा दिवसांत कोसळल्याने अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून, काही भागांत दरडी कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत. काही ठिकाणी पावसाला थांबून पाच दिवस उलटले तरी पाणी अद्याप साचलेले आहे.
 

heavy rainfal  
मुंबईसह राज्यातील अनेक भागांना या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. मुंबईत झालेल्या जोरदार पावसाचा थेट परिणाम लोकल रेल्वे सेवांवर झाला. 1 जुलैपासून राज्यात पावसाचा जोर वाढला होता. सततच्या पावसामुळे अनेक दिवस सूर्याचे दर्शनही झाले नव्हते. मात्र, आज काही भागांत पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे.यंदा 2 जून रोजी केरळमध्ये मॉन्सूनचे आगमन झाले होते. त्यानंतर काही दिवस मॉन्सून अरबी समुद्रातच रेंगाळला होता. जून महिना संपत आला तरी राज्यात अपेक्षित पावसाची सुरुवात झाली नव्हती. अखेर 1 जुलैपासून राज्यात मॉन्सूनने जोर पकडला आणि अनेक भागांत धुव्वाधार पाऊस झाला.
इशारा..
भारतीय हवामान विभागाने heavy rainfal आजही राज्यातील काही भागांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काल पुण्यातील काही भागांत जोरदार पाऊस झाला, तर मुंबईतही रात्री पावसाची संततधार सुरू होती. मात्र, सकाळनंतर मुंबईत पावसाने काहीशी विश्रांती घेतली. कोकणातही पावसाचा जोर कमी झाला असून, या भागासाठी आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.सातारा आणि पुणे घाटमाथा परिसरात आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मॉन्सून आता संपूर्ण देशात दाखल झाला असून, त्याला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. गुजरात आणि केरळच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, जळगाव, धुळे आणि नाशिक घाटमाथा परिसरात आज पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूर आला असून, मोहने जलशुद्धीकरण केंद्रातील पंपांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. नदीच्या तीव्र प्रवाहामुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची मुख्य जलवाहिनी फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा गेल्या 48 तासांपासून ठप्प आहे. याचा मोठा फटका कल्याण-डोंबिवलीच्या पूर्व आणि पश्चिम भागातील हजारो कुटुंबांना बसला आहे.पाणीपुरवठा बंद झाल्याने बेतुरकर पाडा परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महिला बादल्या, टब आणि ड्रममध्ये पावसाचे पाणी साठवून दैनंदिन गरजा भागवत आहेत. काही नागरिकांना पावसाचे पाणी गाळून आणि उकळून पिण्याची वेळ आली आहे.ठाणे जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली असून, मुसळधार सरींमुळे अनेक भागांमध्ये नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.