मनीष पॉलच्या आई उर्मिल पॉल यांचे निधन

७७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    दिनांक :09-Jul-2026
Total Views |
मुंबई
maniesh paul आपल्या विनोदी शैलीने आणि सहजसुंदर सूत्रसंचालनाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा लोकप्रिय अभिनेता आणि टीव्ही होस्ट मनीष पॉल याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मनीष पॉलची आई उर्मिल पॉल यांचे वयाच्या ७७व्या वर्षी दिल्लीत निधन झाले. आईशी अत्यंत जिव्हाळ्याचे नाते असलेल्या मनीषला या धक्क्याने मोठा आघात बसला असून, पॉल कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
 

maniesh paul mother urmila paul passes away at 77 fans and celebrities offer condolences 
मनीष पॉल सोशल मीडियावर आईसोबतचे अनेक खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असतो. आईच्या निधनाच्या अवघ्या पाच दिवसांपूर्वीच त्याने तिच्याशी संबंधित एक गोड आणि भावनिक पोस्ट शेअर केली होती. प्रवासादरम्यान आईने दिलेला एक सल्ला त्याने चाहत्यांसोबत शेअर केला होता. "जेव्हा तू एकटा प्रवास करत असशील, तेव्हा कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी बोलू नकोस," असा काळजीपोटी दिलेला आईचा सल्ला मनीषने आपल्या खास विनोदी अंदाजात मांडला होता.आईच्या या प्रेमळ काळजीवर आधारित मनीषने एक रीलही तयार केली होती. मात्र, काही दिवसांतच तीच आई आपल्यापासून कायमची दूर जाईल, याची कल्पनाही त्याला नव्हती. याशिवाय नुकत्याच पार पडलेल्या मदर्स डे निमित्त मनीषने आईच्या खांद्यावर डोके ठेवलेला एक भावुक फोटोही शेअर केला होता.मनीष पॉलचे आई-वडील दिल्लीत वास्तव्यास होते आणि तिथेच उर्मिल पॉल यांनी अखेरचा श्वास घेतला. या दुःखद बातमीने मनोरंजन maniesh paul विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. अद्याप मनीष पॉल किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र, सोशल मीडियावर चाहते आणि मनोरंजन क्षेत्रातील सहकारी मनीषला धीर देत आहेत.पडद्यावर आपल्या विनोदाने प्रेक्षकांना हसवणाऱ्या मनीष पॉलला या वैयक्तिक दुःखातून सावरण्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.