नागपूरमध्ये उभारणार ‘स्पोर्ट्स हब’

    दिनांक :09-Jul-2026
Total Views |
-खेळाडूंसाठी गुड न्यूज! -रामदासपेठेत एसी बॅडमिंटन हॉल
- प्रतापनगरमध्ये टेबल टेनिस कोर्ट

नागपूर, 
Nagpur: ‘Sports Hub’ आता नागपूरच्या खेळाडूंना सरावासाठी मुंबई-पुण्याला जावे लागणार नाही! कारण मनपाच शहरात दोन भव्य क्रीडा प्रकल्प उभारत आहे. क्रीडा विशेष समिती सभापती दर्शनी धवड यांनी आज या दोन्ही कामांची पाहणी करून अधिकार्यांना ‘कामात कसूर नको’ असा थेट इशारा दिला.
 
 
sport
 
रामदासपेठ : ‘ऑल-इन-वन’ क्रीडा संकुल
मोर हिंदी शाळेच्या जागेवर उभे राहतेय शहरातील पहिले अत्याधुनिक क्रीडा संकुल. हा फक्त प्रकल्प नाही, तर नागपूरच्या युवा खेळाडूंचे स्वप्न आहे. ते वेळेत आणि दर्जेदार पूर्ण झाले पाहिजे, असे सभापती दर्शनी धवड म्हणाल्या.
येथे काय असेल खास?
- वातानुकूलित बॅडमिंटन हॉल - ४५ अंश तापमानातही थंडगार सराव
- बास्केटबॉल + पिकलबॉल कोर्ट
- आंतरराष्ट्रीय दर्जाची स्केटिंग रिंक
- खेळाडूंसाठी पार्किंग, लॉकर रूम, स्वच्छतागृह
 
प्रतापनगर : शांतिनिकेतनला मिळणार टीटी कोर्टची भेट
शांतिनिकेतन मैदानावर सुरू असलेल्या टेबल टेनिस कोर्टच्या कामाचा देखील त्यांनी आढावा घेतला. हे कोर्ट पूर्ण झाल्यावर परिसरातील शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मोफत सरावाची सुविधा मिळेल. सभापती धवड यांनी स्पष्ट सांगितले . ‘निधीची कमतरता नाही. फक्त कामाचा दर्जा आणि वेळ या दोन गोष्टींवर तडजोड चालणार नाही.
कामाची गती वाढवा - अधिकाऱ्यांना सूचना
पाहणीवेळी उपायुक्त मंगेश खवले, क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर आणि अभियंत्यांचे पथक उपस्थित होते.
नागपूर आता खेळाच्या नकाशावर चमकणार!
मनपाच्या या उपक्रमामुळे लवकरच नागपूरमधून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील, असा विश्वास क्रीडा प्रेमींना आहे.