नागराज मंजुळेंच्या ‘खाशाबा’मध्ये पत्नीचीही एंट्री

पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार

    दिनांक :09-Jul-2026
Total Views |
मुंबई
gargi kulkarni मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता नागराज मंजुळे हे त्यांच्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यांच्या आगामी ‘खाशाबा’ चित्रपटाचा दमदार टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. नागराज मंजुळे यांनी यापूर्वी मराठी सिनेसृष्टीला अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. त्यामुळे ‘खाशाबा’कडूनही प्रेक्षकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत.
 

nagraj manjule 
नागराज मंजुळे हे त्यांच्या चित्रपटांइतकेच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतात. त्यांच्या पहिल्या पत्नीबाबत अनेकदा चर्चा झाल्या आहेत. पहिल्या पत्नीने नागराज मंजुळे यांच्यावर काही गंभीर आरोप केले होते. तसेच प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्यांनी आपल्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला होता. मात्र, आता नागराज मंजुळे यांच्या आगामी चित्रपटामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित आणखी एक मुद्दा चर्चेत आला आहे.‘खाशाबा’ या चित्रपटात मराठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. यामध्ये महेश मांजरेकर आणि गिरीश कुलकर्णी यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, नागराज मंजुळे स्वतःही या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.याच चित्रपटातून नागराज मंजुळे यांच्या पत्नी आणि निर्माती गार्गी कुलकर्णी मोठ्या पडद्यावर अभिनय करताना दिसणार आहेत. गार्गी कुलकर्णी यांची ही पहिलीच मोठ्या पडद्यावरील भूमिका असणार आहे. मात्र, ‘खाशाबा’मध्ये त्या नेमकी कोणती भूमिका साकारणार आहेत, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
 
 
नागराज मंजुळे आणि गार्गी कुलकर्णी यांचा gargi kulkarni  विवाह २०१७ मध्ये झाला होता. गार्गी या नागराज मंजुळे यांच्या चित्रपट निर्मितीच्या कामातही सहभागी असतात. त्या चित्रपट निर्माती असून क्रिएटिव्ह रायटिंगचे कामही करतात. मूळच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील असलेल्या गार्गी कुलकर्णी आता थेट पतीच्या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहेत.नागराज मंजुळे यांना खरी ओळख मिळवून देणारा ‘सैराट’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा यश मिळवत मराठी सिनेसृष्टीत नवा विक्रम निर्माण केला होता. चित्रपटातील आर्ची आणि परशा ही पात्रे आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहेत. रिंकू राजगुरू हिला ‘सैराट’मधून मोठी लोकप्रियता मिळाली आणि त्यानंतर तिने अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले. सोशल मीडियावरही रिंकू राजगुरूची मोठी फॅन फॉलोइंग आहे.