पाकिस्तानी गुप्तहेराच्या घरावर एनआयचा छापा

    दिनांक :09-Jul-2026
Total Views |
जयपूर, 
nia-raids : राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) एका पथकाने राजस्थानमधील जोधपूर येथे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचा हँडलर असलेल्या झीशान शेख याच्या घरावर छापा टाकला. भारतीय सुरक्षा दलाची माहिती पाकिस्तानला देणे आणि तरुणांना दहशतवादी संघटनेत भरतीसाठी प्रवृत्त करण्याच्या आरोपात त्याला यापूर्वीच अटक केली होती.
 
 

nia 
 
 
 
एनआयएचे पथक जोधपूरच्या नई सडक भागातील झीशानच्या घरी पोहोचले आणि त्यांनी शोधमोहीम राबवली. यावेळी त्याच्या कुटुंबीयांची चौकशीही करण्यात आली. या कारवाईत बँक खात्याशी संबंधित तपशील, मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केले. आरोपी नियमितपणे ज्या लोकांच्या संपर्कात होता त्यांचीही चौकशी करण्यात आली. जोधपूर सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मानक राम बिश्नोई यांनी सांगितले की, झीशान तरुणांना कट्टरपंथी विचारसरणीशी जोडण्यासाठी इंटरनेटवर ‘बेनेक्स’ नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपचा वापर करत होता. एटीएस आणि पोलिसांच्या तपासानंतर आता एनआयएने या प्रकरणाचा तपास सुरू केला. आरोपी आयएसआयएसच्या संपर्कात होता आणि त्याने भारतीय सुरक्षा दलाशी संबंधित माहिती देखील पाकिस्तानला पुरवली. झीशानला २४ मार्च रोजी आंध्र प्रदेश एटीएस आणि राजस्थान पोलिसांच्या संयुक्त पथकाने अटक केली होती.