जयला होणार शरूच्या संघर्षाची जाणीव, नात्यात येणार बदल

    दिनांक :09-Jul-2026
Total Views |
मुंबई
sanai chaughade झी मराठीवरील ‘सनई चौघडे’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता मालिकेच्या कथानकाला नवे वळण मिळणार असून, गैरसमज, नात्यांमधील तणाव आणि त्यातून होणारी जाणीव यामुळे जय आणि शरूच्या नात्यात मोठे बदल घडताना पाहायला मिळणार आहेत.
 

sanai chaughade serial twist jay regrets his decision after sharus struggle 
जेलमधून सुटल्यानंतर शरू जयच्या स्वागताची तयारी करत आहे. मात्र, आयुष्यात घडलेल्या सर्व घटनांसाठी जय महिलांनाच जबाबदार धरतो. रागाच्या भरात तो आपल्या कार्यालयातील सर्व महिला कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतो. जयच्या या निर्णयामुळे शरूला मोठा धक्का बसतो आणि ती मनातून दुखावते.
दरम्यान, गौतम जयसमोर संपूर्ण सत्य उघड करतो. जयला संकटातून बाहेर काढण्यासाठी शरूने स्वतःच्या सन्मानाचीही पर्वा केली नसल्याची जाणीव त्याला होते. शरूने केलेल्या संघर्षाची माहिती मिळाल्यानंतर जयला आपल्या चुकीचा पश्चात्ताप होतो. त्यानंतर तो कार्यालयातील सर्व महिला कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय घेतो.
दुसरीकडे, परब कुटुंबात आसावरीच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. गौतमने जबाबदार आणि स्वतःच्या पायावर उभे राहावे, अशी सुभाष यांची इच्छा आहे. त्यामुळे गौतमची क्षमता तपासण्यासाठी ते त्याची परीक्षा घेण्याचे ठरवतात.
याच दरम्यान, प्रॉडक्ट सर्व्हेच्या निमित्ताने शरू जयला सामान्य लोकांशी जोडले जाण्याचा नवा दृष्टिकोन शिकवते. तिच्या सहवासामुळे जयच्या विचारांमध्ये बदल होऊ लागतो. सर्व्हेदरम्यान एका वयोवृद्ध जोडप्याला जय आणि शरू हे नवरा-बायको असल्याचा गैरसमज होतो. त्या जोडप्याच्या संवादातून जयला शरूमुळे आपल्या आयुष्यात झालेल्या सकारात्मक बदलांची जाणीव होते.आता शरू आणि जयच्या नात्याला नवी दिशा मिळणार का, जयचा बदल कायम टिकणार का आणि गौतम स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभा राहू शकणार का, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे मालिकेच्या आगामी भागांमध्ये मिळणार आहेत. ‘सनई चौघडे’ ही मालिका दररोज रात्री ८.३० वाजता झी मराठी वाहिनीवर प्रसारित होत आहे.
‘सनई चौघडे’ने पहिल्याच भागापासून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. लालबाग-परळमधील मध्यमवर्गीय कुटुंबाची कथा प्रेक्षकांना भावत आहे. मालिकेने सुरुवातीच्या पहिल्याच आठवड्यात टॉप १० मालिकांच्या यादीत स्थान मिळवले होते. कथानकातील वेगळेपणा, भावनिक गुंतवणूक आणि स्वामींच्या आशीर्वादाची जोड यामुळे मालिकेला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः जय आणि शरू यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष आवडत आहे.