सेवासदनची पहिली पालकसभा

    दिनांक :09-Jul-2026
Total Views |
नागपूर,
Sevasadan High School सेवासदन हायस्कूलमध्ये शैक्षणिक सत्र २०२६-२७ ची पहिली पालकसभा उत्साहात पार पडली. या कार्यक्रमाला ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ रवींद्र देशपांडे प्रमुख मार्गदर्शक म्हणून, तर सेवासदन शिक्षण संस्थेच्या सचिव वासंती भागवत प्रमुख उपस्थित म्हणून लाभल्या.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. मुख्याध्यापक डॉ. अजय चव्हाण यांनी शाळेतील वार्षिक उपक्रम, शासनाच्या विविध योजना व शैक्षणिक नियोजनाची माहिती पालकांना दिली. परीक्षा मंडळ प्रमुख शैलेश बोईनवार यांनी परीक्षेचे नियोजन, तर बस मंडळ प्रमुख सुनील मेंघळ यांनी शाळेच्या बस व स्टार बस सुविधेबाबत माहिती दिली.
 

bal 
 
 
 
संस्थेच्या सचिव वासंती भागवत यांनी पालकांशी संवाद साधत संस्थेच्या कार्याची माहिती दिली आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. Sevasadan High Schoolप्रमुख मार्गदर्शक रवींद्र देशपांडे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. मुलांशी मुक्त संवाद साधणे, त्यांना योग्य संस्कार देणे, विश्वासाचे नाते निर्माण करणे आणि त्यांच्या पोषण आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन मीनाक्षी शेंडे यांनी केले, तर रागेश्री पिंपळघरे यांनी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता केली. पालकसभेला मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
सौजन्य:बाळकृष्ण सुरतने,संपर्क मित्र