माझ्या नवऱ्याने 50 अफेअर करू दे, तुझ्या बापाचं काय?

अंगुरी भाभी’वर भडकली गोविंदाची पत्नी

    दिनांक :09-Jul-2026
Total Views |
मुंबई
lock upp 2 टीव्हीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘लॉक अप २’मध्ये आता ‘भाभीजी घर पर है’ फेम अभिनेत्री शिल्पा शिंदेची एंट्री झाली आहे. शोमध्ये सहभागी होताच शिल्पाने आपला आक्रमक अंदाज दाखवण्यास सुरुवात केली असून, ती विविध स्पर्धकांवर निशाणा साधताना दिसत आहे. मात्र, अभिनेता गोविंदाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांची पत्नी सुनीता अहुजा आणि शिल्पा शिंदे यांच्यात जोरदार वाद रंगला.
 

shilpa shinde and sunita ahuja clash in lock upp 2 over govinda comments 
शिल्पा शिंदेच्या स्पष्टवक्तेपणाला शोमध्ये सुनीता अहुजा यांच्याकडूनही तितक्याच आक्रमकपणे उत्तर मिळताना दिसत आहे. गोविंदाचे नाव घेत शिल्पाने सुनीताशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावर सुनीताने तिला चांगलेच प्रत्युत्तर दिले.
गेल्या काही महिन्यांपासून गोविंदा आणि सुनीता अहुजा यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. काही मुलाखतींमध्ये सुनीता यांनी गोविंदाच्या कथित एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबाबतही भाष्य केले होते. याच मुद्द्यावरून शिल्पा सुनीताला म्हणते, "लोकांनी त्यांचा गैरसमज करून घेतला आहे. मी गोविंदाची चाहती आहे, त्यामुळे एवढंच म्हणेन की तुम्ही असं कसं करू शकता? तुम्ही असं कसं बोलू शकता? तुमच्या मनात काय चाललं होतं, हे तुम्हाला माहीत आहे."
यावर सुनीता अहुजा यांनी शिल्पाला प्रत्युत्तर देताना आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, "कधी स्वतःला माझ्या जागी ठेवून बघ. तुझ्यावर जेव्हा त्या गोष्टी ओढवतील, तेव्हा त्या अनुभवल्यावर तुला कळेल. हे माझं आयुष्य आहे. मला जे हवं ते मी करू शकते. तो माझा नवरा आहे. तो दहा वेगवेगळ्या ठिकाणी त्याला जे हवं ते करेल, पण मी त्याला सोडणार नाही. मी मरेपर्यंत त्याच्यावर प्रेम करेन."
सुनीताच्या या आक्रमक उत्तरानंतर शिल्पा शिंदेने पुढील वाद टाळत तेथून निघून जाणे पसंत केले. त्यानंतर सुनीताने राम कपूरसोबत शिल्पाबद्दल बोलताना आपली नाराजी व्यक्त केली. "तो माझा नवरा आहे. तो काहीही करू शकतो. त्याच्या विरोधात बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही. मी त्याची बायको आहे. हिला इथे मुद्दाम बोलण्यासाठी पाठवलं आहे असं दिसतंय. अति केलं तर माझ्याकडून आणखी ऐकायला मिळेल. मी माझ्या लायकीवर येईन. माझ्या कुटुंबाला यात मध्ये आणू नका. माझ्या नवऱ्याने ५० अफेअर केले तरी त्याच्याशी तुझं काय जातंय," अशा शब्दांत तिने आपला संताप व्यक्त केला.
दरम्यान, शोमध्ये प्रवेश करताच शिल्पा शिंदेने आपला खेळ सुरू केला आहे. तिने आकांक्षा चमोलावरही टिप्पणी केली असून, शिवांगी जोशीसोबतही तिचा वाद झाल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे, शोमध्ये सुनीता अहुजा त्यांच्या खासगी आयुष्याविषयी बोलताना भावूक झाल्या होत्या. त्यावेळी सूत्रसंचालक फराह खान यांनी त्यांना सावरताना सांगितले, "तू फक्त गोविंदाची पत्नी नाहीस, तर तू स्वतः एक सुपरस्टार आहेस."