शेतसर्वेक्षण तातडीने करण्याची मागणी
दोषी कंपन्यांवर कारवाईची मागणी
आर्णी,
सोयाबीन तसेच कपाशीचे बियाणे यावर्षी खरीप हंगामात अनेक नामवंत कंपन्यांच्या वतीने बाजारात पाठवलेले सोयाबीन तसेच कपाशीचे बियाणे मुदतीनंतर उगवलेच नाही. मात्र, या संदर्भातील तक्रारी कुठे कराव्या, असा पेच-शेतकèयांसमोर उभा ठाकला होता. काही शेतकèयांनी तालुका कृषी कार्यालयात तक्रारी नोंदविल्या आहेत. यावर्षी शेतकèयांनी समाधानकारक पावसाचे आगमन झाल्यानंतर पेरणी केली. परंतु, काही कंपन्यांचे सोयाबीन बियाणे उगवलेच नाही. मागील वर्षी सोयाबीनवर यलो मोझॅक रोगाने आक्रमण केल्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट आली होती.
यावर्षी सोयाबीनचे उत्पन्न समाधानकारक होईल, या अपेक्षेने अनेक शेतकèयांनी पेरणी केली. प्रारंभी, मृग नक्षत्र कोरडे गेलेतरी आर्द्रा नक्षत्राच्या सुरुवातीलाच समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकèयांनी कपाशी पाठोपाठ सोयाबीनची पेरणी केली. मात्र, काही नामवंत कंपन्यांचे सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याची सरसकट तक्रार आहे. शेतकरी उन्हाळ्यातच शेतीची मशागत करून पावसाची वाट बघत होते. आर्द्राच्या सुरुवातीलाच दमदार पाऊस पडला. शेतकèयांनी बियाणे खरेदी केले. परंतु, त्यापैकी काही नामांकितांचे सोयाबीन बियाणे जमिनीतून निघालेच नसल्याची ओरड आहे.
महागडे सोयाबीन बियाणे कृषी केंद्रातून खरेदी केले. काही कंपन्यांचे बियाणे दोन-चार दिवसांत अंकुरले. मात्र, अनेक शेतकèयांचे बियाणे विहित मुदतीनंतरही उगवले नाही. अशातच शेकडो शेतकरी नागवल्या गेले. त्यात काही शेतकèयांनी आर्णी येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात येऊन बोगस बियाणे निघाल्याची तक्रार दिली. त्यात सुकळी येथील संजय दळवे, संतोष सांगळे चिकणी, हरीष गावंडे तरोडा, गणेश ठाकरे कोसदनी, प्रकाश ठाकरे अंबोडा व इतर शेतकèयांनी नामांकित कंपन्यांचे सोयाबीन बियाणे अंकुरले नसल्याची तक्रार दिली. आमच्या शेताचे सर्वेक्षण करून नुकसानाचा मोबदला देण्याची मागणी केली आहे.
पाहणी करण्यात येईल
सोयाबीन बियाण्यांची उगवण न झाल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या. या शेतकèयांच्या शेतातील प्लॉटची तालुका तक्रार निवारण समितीद्वारे पाहणी करण्यात येऊन त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असे आर्णी तालुका कृषी अधिकारी आनंद बदखल यांनी सांगितले.