नागपूर,
State-level Poetry Competition विदुमाऊली बहुउद्देशीय संस्था, कनारखेड (जि. बुलढाणा) आणि काव्यसागर साहित्य मंच, शेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय काव्यस्पर्धेत नागपूर येथील सामाजिक भान जपणारे लेखक, कवी व विचारवंत प्रवीण बागडे यांच्या कवितेला प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
राज्यभरातील अनेक कवींच्या सहभागातून झालेल्या या स्पर्धेत प्रवीण बागडे यांच्या सामाजिक जाणीव जागृत करणाऱ्या व विचारप्रवर्तक कवितेची परीक्षकांनी प्रथम क्रमांकासाठी निवड केली. या यशाबद्दल त्यांना संस्थेतर्फे सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. State-level Poetry Competitionप्रवीण बागडे हे सामाजिक, राजकीय व समकालीन विषयांवरील परखड लेखनासाठी परिचित असून, त्यांच्या कविता व लेख विविध वृत्तपत्रे व नियतकालिकांत सातत्याने प्रकाशित होत असतात. त्यांच्या या यशाबद्दल साहित्य, सामाजिक, पत्रकारिता व विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
सौजन्य:प्रवीण बागडे,संपर्क मित्र,