बीएलओ टीईटी विरोधात शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा

*शिक्षक भारती व विविध संघटनाचा सक्रिय पाठिंबा

    दिनांक :09-Jul-2026
Total Views |
लढाणा,
teachers massive protest march शिक्षक अशैक्षणिक कामात गुंतल्यामुळे त्याचा परिणाम अध्यापनावर होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे शिक्षकांना अशैक्षणिक कामे करण्याची सक्ती करू नये यासोबतच टप्पा अनुदान व इतर प्रमुख मागण्यांसाठी राज्यभरातील शिक्षक संघटनांकडून दि. ९ जुलै रोजी शाळा बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. तसेच विविध संघटनांनी एकत्र येऊन बीएलओ व टीईटी विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी महामोर्चा आंदोलन छेडले. शिक्षकांना टीईटी सक्ती रद्द करा तसेच शिक्षकांवर थोपण्यात आलेल्या बीएलओ-एसआयआर कामांच्या विरोधात ९ जुलैला राज्यभर शाळा बंद आंदोलन करण्यात आले.
 
 


teackcsl 
 
 
शिक्षकांना न्याय मिळावा, यासाठी शिक्षक भारतीनेही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. १५ जूनपासून नियमितपणे शाळा सुरू झाल्यानंतर बीएलओ, एसआयआरच्या कामासाठी प्रशासनाने मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर व्यवस्था मोडकळीस आणून संस्थाचालक, कर्मचार्यांवर हे काम करण्यासाठी प्रचंड दबाव आणला आहे. अनेक ठिकाणी एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. शासनाच्या निर्णय प्रक्रियेत सुसूत्रता नाही. तहसील कार्यालयाकडून प्रत्येक केंद्रावर वेगवेगळे आदेश देण्यात आले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने दैनंदिन शैक्षणिक कार्य करून उरलेल्या वेळात तसेच सुट्टीच्या कालावधीमध्ये काम करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, काही ठिकाणी बीएलओ, एसआयआरचे काम करण्यासाठी पूर्ण वेळ कार्यमुक्त करण्यात आले आहे, तर काही ठिकाणी हे काम शुक्रवार, शनिवार व रविवार या तीन दिवसांत करण्याचे आदेश आहेत. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.teachers massive protest march तहसील कार्यालयाकडून शिक्षक कर्मचार्‍यांना अपमानाची वागणूक मिळणे, कोणतीही सुट्टी न घेता काम करण्याचा तुघलकी आदेश देणे, शैक्षणिक शिक्षक कर्मचार्यांना मानसिक त्रास देणे, शिक्षक कर्मचार्‍यांवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करणे यामुळे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. प्रामाणिकपणे काम करणार्‍या शिक्षकांना सरकारने आर्थिक व प्रशासकीय दृष्ट्या न्याय द्यावा शासनाच्या या कारभाराविरोधात शाळा बंद आंदोलन पुकारण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध संघटनेचा महामोर्चा आंदोलन छेडण्यात आले.