पुलगाव,
theft at crematorium येथील राम मंदिर जवळील सीता घाट स्मशानभूमीतील अज्ञात चोरट्यांनी खोलीचे कुलूप तोडून वायरिंग आणि पॅनेल असे महागडे साहित्य लंपास केल्याची घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे, यापूर्वीही चोरट्यांनी येथील मागील लोखंडी गेट चोरून नेले होते. त्यामुळे परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ५ रोजी रात्री स्मशानभूमी परिसरातील हायमास लाईट बंद असल्याची तक्रार नगरपालिकेकडे आली होती. तक्रारीची दखल घेत ६ रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास नपच्या अधिकार्यांनी सीता घाट स्मशानभूमी येथे जाऊन पाहणी केली. अज्ञात चोरट्यांनी येथील खोलीत प्रवेश करून वायरिंग, बटना आणि सॉकेटची तोडफोड करून चोरी केली. तसेच पाण्याची बोअर मोटर आणि हायमास्ट लाईटचे पॅनेलही तोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला.theft at crematorium चोरट्यांनी बोअर मोटरचे पॅनेल, कॉपरची वायरिंग व इतर साहित्य असा मुद्देमाल चोरून नेला. तक्रारीवरून पुलगाव पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.