वर्धा,
suman kalyanpur वाऱ्यात गात आहे आता तुझीच गाणी... हा सुमन कल्याणपूर यांना गाण्यातून श्रद्धांजली कार्यक्रम स्थानिक शिवशंकर सभागृह अग्निहोत्री कॉलेज कॅम्पस येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सुमन कल्याणपूर यांना त्यांच्याच गायलेल्या गीतांद्वारे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सुरभी ढोमणे यांच्या ओमकार प्रधान या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर देव माझा विठू सावळा, केशवा माधवा, हे मराठी अभंग-भजन सादर केली. जिथे सागरा धरणी मिळते, निंबोणीच्या झाडामागे यासारखी भावगीते सुरभी ढोमणे यांनी सादर केली. गायिका अनघा रानडे यांनी घाल घाल पिंगा, रिमझिम झरती श्रावणधारा ही भावगीतं सादर केली. पहिलीच भेट झाली हे द्वंद गीत अनघा रानडे यांनी सुनील राहटेसोबत सादर केले. अरुण उगवला पहाट झाली, नाविका रे वारा वाहे रे, अरे संसार संसार ही मराठी गीतं अवंतिका ढुमणे हिने सादर केली.सांग कधी कळणार तुला, हे युगलगीत शशिकांत बागडदे व अवंतिका ढूमणे यांनी सादर केले. सुरभी व अरुण सुरजूसे यांनी दिल ने फिर याद किया, अजहून आये बालमा यासारखी युगलगीते सादर केली. विश्वास रानडे यांनी तुमने पुकारा और हम चले आये, न तुम हमे जानो, आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे यासारखी गीतं सुरभी ढोमणे व अनघा रानडे यांच्यासोबत सादर केली. शशिकांत बागडदे यांनी किशोर कुमार यांची तेरा मेरा तेरा अवंतीका सोबत, ना जाने कैसे पल, तुमसे ओ हसीना सुरभीसोबत, न जाने कहा तुम थे, ये मौसम रंगीन ये समा अनघा रानडेसोबत ही बहारदार युगल गीते सादर केली. नवोदित गायक अशोक तुरक्याल यांनी अवंतिका ढुमणेसोबत चले जा चले जा... हे युगलगीत सादर केले. निवेदन असलम खान व सुजाता जोशी यांनी केले.
कार्यक्रमाला पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, रवींद्र कोटंबकार, वैद्य नितीन मेषकर, डॉ. अजय वाणे, डॉ. चंद्रकांत जाधव, संजय इंगळे तिगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.