वर्धा,
vidarbha sahitya parishad विदर्भ साहित्य परिषदेद्वारे विदर्भस्तरीय अभंगरचना स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उत्कृष्ट रचनांचा ‘अभंगवाणी विदर्भाची’ हा प्रातिनिधिक ऑनलाईन संग्रह आषाढी एकादशीला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी स्वलिखित व अप्रकाशित अभंग स्वीकारल्या जाणार असून रचनेला विषयाचे बंधन नाही. एका व्यक्तीला अनेक रचना पाठवता येतील, परंतु आशयाची विविधता आवश्यक आहे. अभंगरचनेला शीर्षक देऊन रचनेखाली कवीचे नाव, पत्ता व संपर्क क्रमांक टाकणे अनिवार्य आहे. कवींनी १२ जुलैपर्यंत ई-मेलवर आपली अभंगरचना पाठवायची आहे. उत्कृष्ट रचनांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांने सन्मानित करण्यात येणार आहे. सदर स्पर्धेचा निकाल २५ जुलै रोजी आषाढी एकादशीला जाहीर करण्यात येईल.