ठेवीदारांची १ कोटी ४२ लाखांनी फसवणूक

    दिनांक :09-Jul-2026
Total Views |
वर्धा
wardha credit society अधिक व्याजाचे आमिष देऊन समतानगर येथील वर्धा मर्चंट नागरी सहकारी पत संस्थेने ठेवीदारांची तब्बल १ कोटी ४२ लाख ९० हजार ९७५ रुपयांनी फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
 

wardha credit society fraud of rs 1.42 crore with depositors case registered against chairman 
तक्रारीवरून शहर पोलिसांनी पत संस्थेचे अध्यक्ष भीमराव उर्फ भीमा शंभरकर याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. दिनेश थूल (४९) रा. समतानगर हे उदयसिंह लखपतसिंह भदोरिया, नरेंद्र कापसे व सुनील बिसेन यांच्या सोबत प्लाट डेव्हलपमेंटचे मिळून काम करतात. भीमराव शंभरकर याने त्यांच्या पतसंस्थेत संयुक्त खाते काढण्याचे आमिष दिले होते. चौघांनी त्यांच्या पतसंस्थेत संयुक्त खाते काढले. त्यांच्या खात्यात २८ लाख १५ हजार ५७७ रुपये होते. दरम्यान, दिनेश थूल यांना पैशाची गरज पडल्याने ते बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. परंतु, कर्मचार्याने पैसे नसल्याचे सांगितले. याबाबत पतसंस्थेचे अध्यक्ष शंभरकर यांना विचारपूस केली असता त्यांनी मोठी रक्कम आहे. आठ दिवसांनी मिळेल, असे सांगितले. परंतु, त्यांना २ लाखांचा विड्रालसुद्धा बँकेतून मिळाला नाही. दिनेश थूल यांच्यासह भीमराव गावंडे, रजनी लोहकरे, सुखसेन वासेकर, अनिकेत लोहकरे, कुणाल नवघरे, विशाल कांबळे, सुमेध डोफे, मधुकर भगत, सुनील गावंडे, शुभांगी पाटील, सुधीर पडसपगार, वैभव नगराळे, स्वाती वानखेडे, सुधांशू कांबळे आदींची १ कोटी ४२ लाख ९० हजार रुपयांनी फसवणूक केली. पंतसस्थेचे अध्यक्ष भीमराव शंभरकर हा पसार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.