अपहृत मुलीचा शोध घेवून केले पालकाच्या स्वाधीन

आरोपीस अटक

    दिनांक :09-Jul-2026
Total Views |
वाशीम,
washim police स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अपहृत तीन वर्षीय मुलीचा शोध घेवून तिला तिच्या पालकांच्या स्वाधीत करुन आरोपीस अहिल्यानगर येथून अटक करण्यात आली.
 

washim police rescue abducted three-year-old girl arrest accused in ahilyanagar 
याबाबत सविस्तर असे की, उकळीपेन येथील तक्रारदार महिलेने वाशीम पोस्टे ला तक्रार दाखल केली की, आरोपी राम लांडकर नामक व्यक्तीने फिर्यादीची मुलगी नामे छकुली (काल्पनिक नांव) वय ३ वर्ष हिला जबरदस्तीने तिचे आईचे संमती शिवाय पुसद नाका, वाशीम येथुन अपहरण करून घेवून गेला. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता व अपहरण झालेल्या मुलीचे वय कमी असल्याने तात्काळ स्थानिक गुन्हे शाखा वाशीम यांची पथके तयार करण्यात आली व सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना माहिती मिळाली की आरोपी याआधी अहिल्या नगर परिसरात काम करण्यासाठी होत, त्यावेळी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अहिल्यानगर येथे रवाना करण्यात आले. आरोपी मोबाईल वापरत नसल्याने त्याचा शोध घेणे ही एक मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. त्यामुळे अहिल्यानगर रेल्वे स्टेशन परिसरात त्याचा वावर असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी मुलीची शोध पत्रिका लावण्यात आली व तेथील परिसरात बातमीदार नेमण्यात आले. येथील परिसरात आरोपी मुलीसह दिसून आला. तेव्हा पथक पिंपळगाव येथे रवाना करण्यात आले. मात्र आरोपी तेथून मुली सह झारखंड येथे गेल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ झारखंड येथे रवाना करण्यात आले. मात्र, तेथून आरोपीह हा राजगड परिसरात एका महिले सोबत राहत आहे. मात्र, आरोपीला कुणकुण लागल्याने तो तेथून पसार झाला.
गोपनीय बातमीदार यांचे कडून मिळालेल्या माहिती वरुन आरोपी अहिल्यानगर परिसरात मुलीसह असल्याचे समजले. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अहिल्यानगर येथे रवाना करण्यात आले. शेवटी खडकी येथील एक केटर्स चे शेड मध्ये आरोपी मुलीसह मिळून आला. तेव्हा आरोपीस ताब्यात घेवून मुलगी परी हिला तिचे आईचे स्वाधीन करण्यात आले. सदर कारवाई पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांचे आदेशाने अपर पोलिस अधीक्षक लता फड यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी, स्थानिक गुन्हे शाखा, पोलिस निरीक्षक संजय चौधरी यांचे सुचनेप्रमाणे पोउपनि निलेश जाधव, पोहवा महेश वानखेडे, राजेश राठोड, गोपाल चौधरी, चालक श्याम इंगळे यांनी केली आहे.