अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी

    दिनांक :01-Aug-2026
Total Views |
नागपूर,
Annabhau Sathe लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार 'लेखन प्रेरणा दिन' आद्यक्रांतिगुरू लहूजी साळवे स्मारक ट्रस्टतर्फे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी दीक्षाभूमी परिसरातील अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

anna
 
 
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष विनायक इंगोले यांनी नागपूर महानगरपालिकेने मंजूर केलेला अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा गेल्या पाच वर्षांपासून तयार असूनही त्याची स्थापना झालेली नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. शासनाने हा पुतळा तातडीने उभारावा, अशी मागणी त्यांनी केली.कार्यक्रमाला ट्रस्टचे संस्थापक राजेश खंडारे, कार्याध्यक्ष पदमाकर बावणे, जनहित युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवशंकर ताकतोडे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सौजन्य:शिवशंकर ताकतोडे ,संपर्क मित्र